सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. आताही मनसेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांमध्येही भविष्य दिसत नाही अशी टीक मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीटही केलं आहे.
चक्रीवादळाचा फटका अनेक राज्यांना बसला असला तरी पंतप्रधानांना फक्त गुजरातच दिसतं. त्याच्यापुढे त्यांना काही दिसत नाही. त्यांनी गुजरातला मदतही जाहीर केली आहे. तर इकडे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेशिवाय काही दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला या दोघांमध्येही भविष्य दिसत नाही अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
खरंतर याआधीही संदीप देशपांडे यांनी मोदींवर निशाणा साधला होता. मोदींना तौक्ते चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावं म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत असं वाटेल असे चिमटेही संदीप देशपांडे यांनी काढले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times