टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितेश राणे यांनी ही टीका केली आहे. यावेळी बोलताना राणेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘मनगटात हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे द्यावी. आम्ही राज्यासाठी निधी आणून दाखवू. कोकणाला आम्ही कोटींची मदत करू पण यासाठी उद्धव ठाकरेंनी राजीमाना द्यावा’ असं नितेश राणे म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अद्याप कोकणाला भेटले नाहीत. आताही तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. झाडं कोलमडली असून, घरांची छप्परं उडाली, आंबा आणि काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, बोटी बुडाल्या. यासाठी राज्याकडून मदतीची अपेक्षा आहे. पण ठाकरे सरकार पंचनामे करून फक्त रद्दी जमा करण्याचं काम करत असल्याची टीका नितेश राणेंनी केली.
उदय सामंतांवर निशाणा
यावेळी बोलताना नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरही टीका केली आहे. उदय सामंत यांना त्यांच्या खात्यातील काही कळत नाही असं म्हणत त्यांनी सामंतांवर निशाणा साधला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times