१.
महेंद्र सिंह धोनी- ४५ कोटी
महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एमएस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी’ या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती. २०१५ साली प्रदर्शित झलेल्या चित्रपटासाठी धोनीने मानधन म्हणून ४५ कोटी रुपये घेतले होते.
२.
मिल्खा सिंह- १ रुपया
‘फ्लाइंग सिख’ म्हणून लोकप्रिय असलेले एथलीट मिल्खा सिंह यांनी यांच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटासाठी कोणतंच मानधन घेतलं नव्हतं. जेव्हा चित्रपटाचे निर्माते त्यांना मानधन घेण्यासाठी फार आग्रह करू लागले तेव्हा मिल्खा यांनी फक्त १ रुपया मानधन घेतलं होतं.
३.
महावीर फोगाट- ८० लाख
पहिलवान असलेल्या महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपटात अभिनेता अमीर खानने महावीर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने कमाईचे सारे रेकॉर्ड तोडले होते. आपल्या बायोपिकसाठी महावीर यांनी ८० लाखाचं मानधन घेतलं होतं.
४.
लक्ष्मी अग्रवाल- १३लाख
दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ चित्रपट एका ऍसिड हल्ला झालेल्या मुलीच्या आईष्यावर आधारित होती. ती मुलगी म्हणजे लक्ष्मी अग्रवाल. आपल्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी लक्ष्मीने १३ लाख रुपये घेतले होते.
५.
संजय दत्त- १० कोटी
अभिनेते संजय दत्त यांच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपटासाठी त्यांनी ९ ते १० कोटी रुपये घेतले होते. याशिवाय ‘संजू’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस वरील कमाईमधील हिस्सा देखील संजय यांना देण्यात आला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times