मुंबई– छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी म्हणजे अभिनेता आणि यांची. ९० च्या दशकात संजय आणि गोविंदाच्या जोडीचा प्रचंड बोलबाला होता. त्यांनी एकत्र अनेक हिट चित्रपटात काम केलं. त्यांचं नातंही अत्यंत जवळच होतं. ते दोघेही ऑनस्क्रीन जेवढे मजा मस्ती करत तेवढेच ऑफस्क्रीनही एकमेकांशी गप्पा मारत. परंतु, अचानक एके दिवशी त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आणि संजय- गोविंदाची मैत्री कायमची संपली.

गोविंदा आणि संजय एकमेकांचे जिवलग मित्र होते त्यामुळे गोविंदा सेटवर उशिरा आला तरीही संजय त्याला काहीही बोलत नसे. डेविड धवन यांच्या ‘एक और एक ग्यारह’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी असं काहीतरी घडलं ज्यामुळे गोविंदा आणि संजय यांचं नातं कायमचं तुटलं. गोविंदाला चित्रपटाच्या सीनमध्ये थोडेफार बदल करून हवे होते. परंतु, डेविड यांना ते बदल करणं योग्य वाटलं नाही आणि त्यांनी गोविंदाला नकार दिला. जेव्हा संजयला ही गोष्ट माहीत पडली तेव्हा त्यानेही डेविड यांची बाजू घेतली. या गोष्टीमुळे गोविंदा दुखावला गेला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तर सगळं काही ठीक होतं. परंतु, संजय आणि गोविंदा मधील नातं पहिल्यासारखं राहिलं नव्हतं.

त्यानंतर घडलेल्या आणखी एका घटनेने गोविंदा आणि संजय यांची मैत्री कायमची तुटली. संजयची एका अंडरवर्ल्ड मधील व्यक्तीसोबतची फोन रेकॉर्डिंग लीक झाली होती. ज्यात संजय त्या व्यक्तीशी गोविंदाबद्दल बोलत होता. त्यात संजय गोविंदाचं नाव घेऊन म्हणतो, तो सेटवर वेळेवर येत नाही. असंही म्हटलं जातं की या रेकॉर्डिंगमध्ये संजयने गोविंदाला शिवी दिली होती. त्यानंतर मात्र संजय आणि गोविंदाची जोडी कधीही पडद्यावर एकत्र झळकली नाही. एवढ्या चांगल्या मित्रांच्या मध्ये आलेल्या या दुराव्यामुळे दोघांचेही चाहते दुखावले गेले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here