नवी दिल्लीः करोना व्हायरसने मधुमेहाचा आजारही होऊ शकतो, असं आयसीएमआरने (ICMR) सांगितलं. आरोग्य मंत्रालयाची गुरुवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी ( ) करोनाबाबत माहिती दिली. करोना व्हायरसचा संसर्गाने तुम्हाला मधुमेहही होऊ शकतो. कारण करोना व्हायरस हा तुमची शुगर वाढवतो. याचा अर्थ असा की तुम्हाला शुगर नसेल तर उपचारादरम्यान ( ) मधुमेह होऊ शकतो. देशात वाढत्या mucormycosis म्हणजे ब्लॅक फंगसच्या वाढत्या रुग्णांमागे हे ही कारण ( ( ) ) असू शकतं, असं भार्गव यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने गुरुवारी सर्व राज्यांना पत्र लिहून म्युकोरमायकोसिसला महामारी घोषित करावं, असे निर्देश दिले आहेत. राजस्थानसह देशातील ३ राज्यांनी या आजाराचा समावेश महामारीच्या श्रेणीत आधीच केला आहे. राजधानी दिल्लीतही म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांवर वेगळ्या केंद्रात उपचार करण्यात येत आहेत.

‘करोना रुग्णांना मधुमेहाचा धोका’

करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारात रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्सचा उपयोग केला जातो. स्टेरॉइड्सचा उपयोग हा व्हायरल लोड कमी करण्यासाठी होतो. पण हे काही करोना व्हायरसवरील उपाय नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी रेमडेसिवीर हे करोनावरील उपचाराच्या औषधांच्या यादीतून हटवले. कारण यामुळे फायदा कमी आणि साइड इफेक्ट अधिक आहेत. अशा औषधांच्या अनिर्बंध वापरामुळे करोना रुग्णांमध्ये मधुमहेची समस्या निर्माण होत आहे.

आधीच करोना व्हायरसविरोधात लढत असलेले रुग्ण शरीरातील शुगर वाढल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. अशा स्थितीत फंगल इन्फेक्शनचा धोका अनेक पटीने वाढतो. यामुळे ब्लॅक किंवा व्हाइट फंगस होतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here