वाचा:
‘ मुंबई हाय ‘जवळ ओएनजीसीच्या बार्जचा (तेल उत्खननाचा निवासी तरंगता फलाट) अपघात झाला. हा अख्खा ” चक्रीवादळाच्या तडाख्यात वाहून गेला. त्यामध्ये आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला असून, २६ जण अजूनही बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अॅलर्टच चुकला, असा आरोप (ओएनजीसी) यांनी केला आहे. यासंदर्भात ओएनजीसीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यानुसार, हवामान खात्याने वादळाची चुकीची माहिती दिली. हे वादळ पश्चिमेकडे जाईल व त्याचा प्रभाव कमी होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. त्यामुळेच दोन बार्ज हलवल्यानंतर तिसरा बार्ज मात्र हलविण्यात आला नाही, असे यात म्हटले आहे.
वाचा:
हवामान खात्याने आरोप फेटाळला
हवामान खात्याने मात्र हा आरोप फेटाळला आहे. अशाप्रकारचा कुठलाही चुकीचा अॅलर्ट देण्यात आला नव्हता. वादळ पश्चिमेकडे जाईल व त्याचा प्रभाव बार्जवर पडणार नाही, असे काहीदेखील म्हटलेले नव्हते. उलट वादळाचा संभाव्य मार्ग, त्याची तीव्रता तसेच त्याची सद्य:स्थिती, याबाबत दर तीन तासांनी समुद्राशी संबंधित सर्वच यंत्रणांना सातत्याने माहिती दिली जात होती. त्यात वादळ मार्ग बदलणार, असे काहीदेखील म्हटलेले नव्हते, असे हवामान खात्याने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राबाबत म्हटले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times