पुणे: महापालिकेला लशींचा पुरवठा न झाल्याने आज (शुक्रवारी) सर्व केंद्र बंद राहतील. सोमवारी व मंगळवारीदेखील शहरातील लसीकरण केंद्रे बंद होती. बुधवारी शहरात केवळ ९३५ नागरिकांचेच लसीकरण झाले. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा लसीकरण जवळपास ठप्प असल्याचेच चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी शहरात चार हजार ५७९ नागरिकांना लस देण्यात आली. ( )

वाचा:

गेल्या रविवारी शहरात फक्त ”चा दुसरा डोस देण्यात आला. त्या वेळी एक हजार १३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. याच काळात महापालिकेने उपलब्ध लशींचा वापर फक्त दुसऱ्या डोससाठीच करायचा निर्णय घेतला होता. यानंतर लसपुरवठा न झाल्याने सोमवार व मंगळवारी लसीकरण ठप्प होते. मंगळवारी महापालिकेला लशी मिळाल्या. मात्र, तेव्हाच केंद्र सरकारने ”च्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढवले. लशी फक्त दुसऱ्या डोससाठीच वापरायचा निर्णय असल्याने लाभार्थी शोधण्याची वेळ महापालिकेवर आली होती. शेवटी मंगळवारी दुपारी तीननंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाचा:

गुरुवारी ४८ केंद्रांवर कोव्हिशील्ड लस उपलब्ध होती. यातील ६० टक्के डोस ऑनलाइन अपॉइंटमेंटद्वारे पहिल्या डोससाठी, २० टक्के वॉक इन पद्धतीने; तर २० टक्के डोस ८४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठी राखीव होते. एकूण १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन फक्त दुसऱ्या डोससाठीच उपलब्ध होती. या केंद्रांवर दिवसभरात चार हजार ५७९ नागरिकांना लस देण्यात आली. गुरुवारी महापालिकेला लशी उपलब्ध होतील, अशी आशा होती. परंतु, लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महापौर यांनी दिली.

गुरुवारी झालेले लसीकरण

वयोगट:

६० व पुढे पहिला डोस- ९७२
६० व पुढे दुसरा डोस- ५५६
४५-५९ पहिला डोस- २,११९
४५-५९ दुसरा डोस- ३८२

फ्रंटलाइन वर्कर्स

पहिला डोस- २११
दुसरा डोस- १२०

आरोग्य कर्मचारी

पहिला डोस- १६९
दुसरा डोस- ५०

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here