: विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील सर्व सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी . यांनी गुरुवारी निर्गमित केले आहेत. ( )

वाचा:

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे. जिल्ह्यात किराणा सामानाची सर्व दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, पिठाची गिरणी व रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, पिठाची गिरणी व रेशन दुकाने यांना ग्राहकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यास मुभा राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे आदेश जिल्ह्यात लागू राहणार आहेत.

वाचा:

दरम्यान, राज्यात १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत लागू आहे. त्या आदेशाला अनुसरूनच जिल्ह्यात अधिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २७ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतसाठी हे आदेश असल्याने त्यापुढे जिल्ह्यात काही अधिक सवलती मिळणार का, हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील करोना संसर्गाची तेव्हाची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here