मुंबई: तौक्ते चक्रीवादळादरम्यान अरबी समुद्रात बार्ज पी-३०५ बुडाल्या प्रकरणी पार्टचे कँप्टन राकेश बल्लव यांच्या विरोधात यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जवरील मुख्य अभियंता मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला आहे. (a case has been registered against in connection with the )

तौक्ते चक्रीवादळाची सूचना असताना कँप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला. या दुर्घटनेत बुडालेल्यांच्या मत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र असे असतानाही ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. यामुळे तब्बल ७०० कामगारांचा जीव धोक्यात आला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
ओएनजीसीने तातडीने कामगारांना परत बोलवायला हवं होतं. पण दुर्लक्षामुळे तब्बल ३७ कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ओएनजीसीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केला होता.

क्लिक करा आणि वाचा-
या दुर्घटनेत आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत नौदलाला १८६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.

तौक्ते चक्रीवादळात ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात ‘पापा ३०५’ ही बार्ज (तेल उत्खनन करणारा निवासी तरंगता फलाट) नौका ‘तौक्ते’ सोमवारी रात्री समुद्रात बुडाली. अपघातावेळी या नौकेवर २६१ कर्मचारी होते. या दुर्घटनेनंतर तातडीने नौदलाच्या पाच युद्धनौका, तटरक्षक दलाच्या दोन नौका तसेच, दोन अन्य जहाजांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here