औरंगाबाद : औरंगाबादमध्ये वडिलांनीच लेकीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आरोपी पिता हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. जेवताना सतत रडते म्हणून सावत्र पित्याने मुलीचा खून केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये पिता अवघ्या १४ वर्षांचा आहे. मुलगी जेवताना सतत रडते म्हणून रागात पित्याने तिचा खून केला. आरोपी वडिल इथपर्यंतच थांबला नाही तर त्याने पुढे चिमुकलीला चक्क जमिनीत पुरले. गंगापूर तालुक्यातील अंतापूर गावातली ही घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध सुरू केला. यावेळी पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपी पिता हा अवघ्या 14 वर्षाचा आहे. त्याने एका 20 वर्षीय महिलेशी लग्न केले होते. पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत असून आरोपी पित्याला ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here