गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पोलीस नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. यामध्ये तब्बल ८ ते १० नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. तर पोलीस चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सी-60 कमांडो पथकाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांआधीही गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवादी चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. यानंतर आजची ही वर्षभरातील सगळ्यात मोठी कारवाई असून यामध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्येही अजूनही चकमक सुरू आहे. याआधी एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावला होता. त्यानंतर नक्षलविरोधी पोलीस पथक जांभिया-गट्टा जंगल परिसरात शोध मोहीम राबवत जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश मिळालं होतं.

२९ मार्च रोजी खोब्रामेंढा जंगल परिसरात नक्षली नेता भास्करसह पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले होते. या घटनेनंतर नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला होता. नक्षलवाद्यांनी नुकतीच भारत बंदची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे रस्त्याच्या कामावरील सहा वाहनांची जाळपोळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर गडचिरोली पोलीस दलाने ही कारवाई केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here