सध्या राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात असून पुढील दिवसातील स्थिती पाहूनच लॉकडाउन वाढवायचा की नाही ते ठरवावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील करोना कमी होतोय हे नक्की असून आताच आपण त्याबाबत काही बोलू इच्छित नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. गेल्या वेळी करोनाची लाट आल्यानंतर राज्याने करोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र त्यानंतर थोडी शिथिलता दिल्यानंतर हा आटोक्यात आलेला करोना चौपटीने वाढला, असे मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले.
क्लिक करा आणि वाचा-
सध्याचा करोनाचा विषाणू हा अत्यंत घातक असून तो वेगाने पसरत आहे. या विषाणूमुळे अनेक पटींनी नागरिक बाधित होत आहेत. गेल्या वेळेसी तुलना केल्यास यावेळची परिस्थिती वाईट आहे. मात्र पुढे आपण कडक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यास मागील अनुभवावरून आपल्याला शहाणे व्हावे लागेल. करोनावर असेच नियंत्रण मिळवण्यासाठी करोनाचे नियम मात्र पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी लॉकडाउन वाढवणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या काही दिवसांमधील स्थिती पाहूनच त्यावर निर्णय घ्यावा लागेल.
क्लिक करा आणि वाचा-
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही केले होते भाष्य
राज्यात लॉकडाउन वाढवला जावा किंवा कसे याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही भाष्य केले होते. करोनाची रुग्णसंख्या किती आहे यावर कडक निर्बंध वाढवायचे की नाही ते ठरवावे लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा राज्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाने चाचणी करून घ्यावी यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
क्लिक करा आणि वाचा-
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times