सिंधुदुर्गः तौक्ते वादळाचा तडाखा बसलेल्या गुजरातचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौरा केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे राजकीय पडसाद उमटले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र भाजपवर व पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. या टीकेला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याचा आधार घेत प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री केवळ दोनच जिल्ह्यात का आले?, इतर जिल्ह्यात का जात नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून वादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलत होते. पंतप्रधान मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले? असा सवाल करता मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलादेखील बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाही?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवाय, वादळाचा अॅलर्ट असताना देवगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही?, असा सवालही फडणवीसांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here