ते पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. खरंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या हवाई मार्गे गुजरातमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावरही चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाहणीसाठी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे हवाई मार्गेच पाहणी करा असा सल्ला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला होता. इतकंच नाहीतर महाराष्ट्रात पाहणी करण्यासाठी इथलं हवामान योग्य नाही आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात आले नाहीत असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
‘मी विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही’
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाचा दौरा करत राज्य सरकारकडे मदतीची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील असून ते महाराष्ट्राला मदत करतील असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी मी विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे आम्हीही पंतप्रधानांना मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचे कळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील आहेत. ते योग्य ती मदत करतील याचा आपल्याला विश्वास आहे. मात्र, राज्य म्हणून आम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times