मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत स्फोटकांनी भरलेली कार व व्यापारी मनसुख हिरन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएनं यांना अटक केली होती. सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक नावही समोर येत आहेत. त्याचवेळी काझी यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर एनआयएनं काझी यांना अटक केली होती. काझी यांच्या अटकेनंतर त्यांच्यावर गंभीर स्वरुपाच्या गुन्हाचा ठपका ठेवत पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.
काझी यांच्या निलंबनानंतर त्यांच्यावर अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून शुक्रवारी या कारवाईबाबतचे आदेश जारी केले. याआधी ११ मे रोजी वाझे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
पुरावे नष्ट केल्याचा संशय
एनआयएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्यासाठी आणि त्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरन यांची हत्या करण्यासाठी तसेच हे गुन्हे करण्याआधीही वाझे हे गाड्यांच्या नंबर प्लेट वारंवार बदलले होते. त्याचवेळी पोलिस निरीक्षक काझी हे विक्रोळीतील नंबर प्लेट तयार करणाऱ्या एका दुकानात जाताना सीसीटीव्ही कॅमेरात दिसले होते. याखेरीज वाझे यांच्या ठाण्यातील सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी जाताना काझी हे अन्य एका सीसीटीव्ही कॅमेरात दिसले होते.
कोण आहेत रियाझुद्दीन काझी
सह पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी हे २०१०च्या तुकडीतील निरीक्षक आहेत. उप निरीक्षकानंतर सह पोलिस निरीक्षकपदी बढती मिळताच त्यांची अलिकडेच बदली गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सीआययू) झाली. तेव्हापासून ते सचिन वाझे यांच्या खास विश्वासातले ठरले होते. त्यामुळेच हे गुन्हे करण्यात वाझे यांनी त्यांनादेखील सहभागी करून घेतले. पण आता त्यांना अटक झाल्याने मोठ्या प्रकरणाचा फेरा त्यांच्या मागे लागला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times