पुणे : करोनाच्या (Coronavirus) संसर्गामुळे पुण्यात कडक लॉकडाऊन (Pune lockdown) असलं तरी हत्येचा (Pune Murder) एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका तरुणाची विटा आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हत्येमागचं कारण धक्कादायक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या मांगडेवाडी इथं तरुणाची हत्या (Murder of a young man) करण्यात आली आहे. हत्येच्या अवघ्या १२ तासातच पोलिसांनी () दोन आरोपी तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन विकत घेतलेल्या जमिनीवर वीज आणि पाण्याची सुविधा न दिल्यानं बदला घेण्यासाठी हे कृत्य करण्यात आलं आहे.

अधिक माहितीनुसार, मोहन संपत चवडकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून विकास चव्हाण आणि सचिन डाकले अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावं आहेत. मोहन हा आपलं काम संपवून एका काम सुरू असलेल्या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी मित्रांसोबत मद्यपान करत बसला होता.

रात्री खूप उशिर झाला तरी तो घरी न आल्याने कुटुंबाने तपास केला असता अतिशय गंभीर अवस्थेमध्ये मोहनचा मृतदेह आढळून आला. यावर कुटुंबाने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोहनचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर सध्या पोलीस तपास सुरू असून ताब्यात घेतलेल्या तरुणांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here