पुणे: तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला मोठा फटका दिल्यानंतर आज यांनी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात नुकसानीची माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून राज्यातील विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेत्या यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ३ तासांच्या कोकणदौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या हे कृपा करून विचारू नका, अशा शब्दात वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना ३ तासांमध्ये पर्यटन फोटोसेशन शक्य नसल्याने त्यानी ते रद्द केले आहे, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘देवेंद्रजी..काय राव तुम्ही थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना, ३ तासाच्या कोकण दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या, कितींच सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका, आणि हो पर्यटन फोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं!’

क्लिक करा आणि वाचा-
चित्रा वाघ यांच्या पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हे ते बाहेर पडले आहेत. ते दीड वर्षानंतर बाहेर पडले आहेत. त्यांनी आता इतरांना उपदेश करण्याचे काही कारण नाही. माझा हवाई प्रवास नाही माझा जमिनीवरून प्रवास आहे, असे ते म्हणतात. मात्र, तुमचा जमिनीवरचा प्रवास आणि तुमचे पाय जमिनीवर राहण्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here