मुंबई: तौक्ते चक्रीवादळात झालेल्या ‘पी-३०५’ या बार्जच्या अपघातानंतर ‘मुंबई हाय’जवळ हाती घेण्यात आलेली शोधमोहीम सुरूच असून आज २ मृतदेह सापडले आहेत. याबरोबर आतापर्यंत एकूण ५१ मृतदेह हाती आले आहेत. अजूनही २४ जण बेपत्ता असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. शोधमोहिमेला आतापर्यंत एकूम १८६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ( two more bodies were found today 24 employees still missing)

‘मुंबई हाय ‘जवळ ओएनजीसीच्या बार्जचा (तेल उत्खननाचा निवासी तरंगता फलाट) अपघात झाला. हा अख्खा बार्ज ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या तडाख्यात वाहून गेला. त्यामध्ये आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण अजूनही बेपत्ता आहेत.

तौक्ते चक्रीवादळाची सूचना असताना कँप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज हलवण्याचा निर्णय घेतला नाही. यामुळे इतर कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत बुडालेल्यांच्या मत्यूला कॅप्टन बल्लव हेच कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी ओएनजीसीवर गंभीर आरोप केले आहेत. तौक्ते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला असताना देखील ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. यामुळे तब्बल ७०० कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केले नाही आणि यामुळेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला’ असा आरोप मलिक यांनी केला होता.

क्लिक करा आणि वाचा-
तौक्ते चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर ओएनजीसीने तातडीने कामगारांना परत बोलवायला हवे होतं. पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यामुळे तब्बल ३७ कामगारांचा मृत्यू झाला. या मृत्यूस जबाबदार ओएनजीसी जबाबदार आहे. म्हणून ओएनजीसीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here