करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. यामुळे अनेकांचा रोजगार गेला. उद्योग बंद पडला. रोजचे जगणे अवघड झाले. कुटुंबाचा उदरनिर्वाहच अवघड झाल्याने शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न अनेक युवकांना पडला. अशा कठीण प्रसंगाला सामोरे जात असलेल्या पाचशेवर युवकांनी एकत्र येत चार पैसे मिळवण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केला. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व मुंबईतील तरूणांचा समावेश आहे.
कोल्हापुरातील बीसीइ फौंडेशन आणि वृक्षप्रेमी वेल्फेअर संघटनेच्यावतीने ‘मँगोज फॉर एज्युकेशन’ ही संकल्पना सुरू केली आहे. प्रशांत भोपळे व निखील मोरे या दोन युवकांनी यामध्ये पुढाकार घेतला. गेली पाच वर्षे वृक्षारोपणाचे काम करणाऱ्या या कॉलेजकुमारांकडे सहा जिल्ह्यातील सर्वसामान्य घरातील युवकांचा डेटा होता. या सर्वांना संपर्क साधून त्यांनी आंबे विक्रीचा पर्याय सांगितला. हा पर्याय सर्वांना आवडला. त्यातूनच या उपक्रमाला सुरुवात झाली.
क्लिक करा आणि वाचा-
कोकणातून आंबे आणून ते या पाचशे मुलांकडे पाठविले जातात. ते आंबे विकून त्यातून मिळणारे पैसे शिक्षणासाठी खर्च करण्याचा हा उपक्रम आहे. पहिल्याच आठवड्यात या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे युवकांना अधिक हुरूप आला. अनेकांच्या मदतीने त्याला व्यापक रूप देण्यात येत आहे. केवळ आंबे विकण्याबरोबरच वृक्षारोपण चळवळही या युवकांनी सुरू केली आहे. प्रत्येक पेटी विकल्यानंतर एक आंब्याचे रोप लावण्याची सक्ती या युवकांना करण्यात आली आहे. यामुळे या युवकांकडून काही हजार आंब्याची रोपे लावण्यात येणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times