करोनाबाधितांची उपचारादरम्यान कमी झालेली प्रतिकारशक्ती, बाधित रुग्णांना दिले जाणारे अति स्टेरॉईडस् औषधे याला कारणीभूत ठरू शकतात. बाधितांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो व त्यामुळे आजार होतो. रुग्णाला मध्यम व गंभीर लक्षणे नसतील तर स्टेरॉईड दिले जाऊ नये. रुग्णाची मधुमेहाची पातळीही पाहणे गरजेचे आहे, असं मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
करोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईडचा अनावश्यक वापर टाळावा. जिथे आवश्यकता म्हणून तसे उपचार केले असतील, तिथे रुग्णांना वेळीच माहिती देणे, त्यावर देखरेख ठेवणे हेही आवश्यक आहे. स्टेरॉईडचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने संनियंत्रण करावे. स्टेरॉईडच्या संतुलित वापराबाबत सर्व रुग्णालयांना सूचना देण्यात येत असून औषध दुकानदारांनीही प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड देऊ नयेत, तसंच अन्न व औषध प्रशासनाने याबाबत संनियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
करोनापश्चात रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांची बैठक जिल्हाधिकारी नवाल यांनी आज घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. बबन बेलसरे, डॉ. सरिता पाटणकर, डॉ. क्षितीज पाटील, डॉ. नीरज मुरके, डॉ. स्वप्नील के. शर्मा, डॉ. दिनेश ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times