पुणे: करोनाचा चिकनमधून संसर्ग होत असल्याच्या अफवा व्हायरल होत असल्याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसू लागला आहे. त्यामुळे राज्यात दर दिवशी होणाऱ्या चिकनच्या खपावर परिणाम झाला असून सुमारे ३०० टनांनी विक्री घटल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, करोनाचा प्रसार चिकनमधून होत नसल्याचे सांगून चिकन हे मानवी आहारासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे व नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

करोनाचा प्रसार चिकनमधून होतो, असा अपप्रचार केला जात असून त्याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. मात्र, चिकनपासून करोनाचा प्रसार होत नाही, त्याबाबत शास्त्रीय माहिती देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर यांच्यावतीने बीजे वैद्यकिय महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यावेळी डॉ. विनायक लिमये, ससूनचे उपअधिष्टाता डॉ. राजेश कार्यकर्ते, अधीक्षक डॉ. अजय तावरे, उपअधीक्षक डॉ. विजय जाधव उपस्थित होते.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here