मुंबई: सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे दुसरे आश्चर्य नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी केली आहे. त्याला लगेचच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ( )

वाचा:

चक्रीवादळाने कोकणात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आणि प्रवीण दरेकर हे राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसिद्ध झालेल्या फोटोत दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी ‘नायकी’चे की ‘पूमा’ चे बूट घातलेत हे माहीत नाही परंतु, फोटोत मात्र एकसारखेच बूट दिसत आहेत, असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. मलिक यांच्या या टोलेबाजीवर प्रवीण दरेकर यांनी खरमरीत शब्दांत पलटवार केला आहे.

वाचा:

आम्ही बूट घातले की सूट घातले यावर नवाब मलिक बोलत आहेत. आम्ही नुकसानीची पाहणी करत असताना ते घरात बसून आमच्यावर टीका करत आहेत. सत्ताधारी मंत्री अशी टीका करत असतील तर या पेक्षा लोकशाहीची थट्टा असू शकत नाही, असा संताप दरेकर यांनी व्यक्त केला. मलिक यांनी आमचे बूट पाहण्यापेक्षा कोकणात जाऊन पाहणी करावी. तिथे जनता त्यांना कोल्हापुरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही. इतका संताप तेथील जनतेमध्ये सरकारविषयी आहे, असे दरेकर म्हणाले.

वाचा:

तीन जिल्ह्यांना तब्बल ३ तास दिल्याबद्दल आभार

प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री यांच्या कोकण दौऱ्यावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांचा हा खऱ्या अर्थाने ‘वादळी’ दौरा होता. वादळ येण्यापूर्वी जसे ३ दिवस प्रशासन कामाला लागते तसेच आताही झाले. या ‘वादळा’ने फक्त ३ तासात धूळधाण केली. या ‘वादळा’मुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पण पानं शिल्लक राहिली नाहीत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून घराबाहेर पडून, कोकणातील ३ जिल्ह्यांना मिळून तब्बल ३ तास दिल्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here