आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.३४ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.०४ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९४.७१ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.११ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर ९१.०१ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८३.८० रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८८.६२ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८६.६४ रुपये प्रती लीटर झाले आहे.
मागील १२ दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने पेट्रोल २.६९ रुपयांनी महागले आहे. पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या विधान सभा निवडणुकांमुळे कंपन्यांनी जैसे थेच ठेवले होते. मात्र त्यानंतर कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला. याच काळात डिझेलच्या किमतीत ३.०७ रुपयांची वाढ झाली आहे.
मध्य-पूर्वेत इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या शस्त्रसंधीने युद्धजन्य परिस्थिती निवळली आहे. तर युरोपात वाहतुकीवरील निर्बंध जवळपास संपुष्टात आले आहेत. त्यामुळे तेथे कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे. यामुळे शुक्रवारी जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव अडीच टक्क्यांनी वधारला होता. शुक्रवारी सिंगापूर बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १.३३ डॉलरने वधारला आणि प्रती बॅरल ६६.४४ डॉलर झाला. यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.६४ डॉलरच्या तेजीसह ६३.५८ डॉलर प्रती बॅरल झाला होता. कच्च्या तेलाचा भारत हा जगातील तिसरा मोठा ग्राहक देश आहे. मात्र सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला असून अनेक राज्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times