मुंबई : सार्वभौम सुवर्णरोख्यांची चालू आर्थिक वर्षातील दुसरी मालिका येत्या सोमवारपासून गुंतवणुकीसाठी खुली होणार आहे. ज्यांना पहिल्या मालिकेत गुंतवणूक करता आली नाही, अशा गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. येत्या सोमवारी २४ मे २०२१ रोजी खुली होणार आहे. २८ मे २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करता येईल. गोल्ड बॉंडच्या दुसऱ्या मालिकेसाठी प्रती ग्रॅम ४८४२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून ‘गोल्ड बॉंड’ इश्यू केले जाणार आहेत. या मालिकेसाठी प्रती ग्रॅम सोन्याचा दर ४८४२ रुपये जाहीर करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील सार्वभौम सुवर्ण रोख्यांची पहिली मालिका सोमवार १७ मे २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान पार पडली होती.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय असलेल्या सोन्याने मागील वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात मृत्यूचे थैमान घातले आहे. त्यामुळे अनिश्चितता वाढली आहे. गेल्या काही आठवड्यात याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटले आहेत.दरवर्षी गोल्ड बाँडवर २.५० टक्के व्याज मिळेल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.

गोल्ड बॉंडमध्ये आठ वर्षाहून अधिक गुंतवणूक केली तर त्यावर कर आकारला जात नाही. या योजनेत गुंतवणूकदाराच्या खात्यावर दर सहा महिन्यांनी व्याज दिले जाते. या व्याजाच्या रकमेवर देखील टीडीएस आकारला जात नाही. त्यामुळे कर बचतीच्या दृष्टीने गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत आहे.

ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणार सवलतदरम्यान, गोल्ड बाॅंडसाठी आॅनलाईन अर्ज सादर करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रती ग्रॅम ५० रुपये सवलत देण्यात येणार आहे. डिजिटल इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून ही सवलत दिली जाणार आहे. सवलतीनंतर गुंतवणूकदारांना सोन्याचा भाव प्रती ग्रॅम ४७९२ रुपये असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here