मुंबई : करोनाचा जीवघेणा संसर्ग वेगाने फैलावत असताना एका बाजूला मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला आर्थिक धोरण आखण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेत RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी यासाठी वापरावे असं रोहित पवार म्हणाले आहेत.

यासंबंधी रोहित पवारांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विटही शेअर केलं. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, ‘देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी ₹ ची तरतूद आणि @RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी ₹ या कार्यक्रमासाठी वापरता येतील.’

इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी करोना रोखण्यासाठी कसं नियोजन केलं पाहिजे याचाही सल्ला केंद्राला दिला आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, ‘राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथं कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि #GST मध्ये संबंधित राज्याचा वाटा यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचं प्रमाण ठरवावं.असं केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू!’

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या तिजोरीतून 99,122 कोटींची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारच्या 99,122 कोटी रुपयांच्या हस्तांतरणास केंद्रीय बँकेच्या मंडळाने मान्यता दिली. मार्च 2021 रोजी संपलेल्या 9 महिन्यांत हा निधी आरबीआयच्या आवश्यकतांपेक्षा वेगळा आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 589 व्या बैठकीत आरबीआयचा निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरबीआय संचालक मंडळाची बैठक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here