म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

ग्रामीण भागात करोनाबद्दल ग्रामस्थांच्या मनातील भीती कायम आहे. त्यामुळे चाचणी करून घ्यायलाच ते घाबरतात. कर्जत तालुक्यातील वायसेवाडी गावात असा प्रकार घडला. आरोग्य पथक गावात अँटीजेन चाचणी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, त्यांना पाहून गावकरी शेतावर कामाला निघून गेले. चाचणीसाठी कोणीच पुढे येईना. शेवटी गावातील माजी सैनिकांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपला लष्करी गणवेश चढविला आणि गावकऱ्यांकडे गेले. त्यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो ग्रामस्थ चाचणी करून घेण्यासाठी आले. सुदैवाने कोणीही पॉझिटीव्ह आढळून आले नाही. (due to the efforts of the ex-soldiers, the villagers got ready to do taste of the corona in ahmednagar)

नगर जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग जास्त पसरत असल्याचे आढळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीनंतर आता हिवरे बाजारचा पॅटर्न गावागावात राबविण्यास सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भोसले यांनी गावागावात चाचण्या करून बाधितांना विलगीकरणात ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यातील वायसेवाडी गावात आरोग्य पथक पोहचले. पथक येणार असून गावकऱ्यांनी तपासणी करून घ्यावी, अशी माहिती आधीच देण्यात आली होती. अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन आवाहन केले, ग्रामस्थांचे प्रबोधन करून त्यांना चाचणीसाठी शिबिराकडे येण्याचे आवाहन केले. मात्र, कोणीही यायला तयार नव्हते. अनेक गावकऱ्यांनी चाचणी टाळण्यासाठी घरात बसणे पसंत केले तर कोणी शेतावर, कामावर निघून गेले.

आता काय करायचे, हा प्रश्न पडला. ग्रामसेवक गुणवंत शेजाळ आणि आलेले आरोग्य पथक चिंतेत पडले. बराचवेळ झाला तरी एकाही ग्रामस्थाची चाचणी होऊ शकली नव्हती. याची माहिती गावातील छगन सूळ यांना समजली. त्यांनी शेजाळ यांच्याशी बोलून आम्ही माजी सैनिक काही मदत करू का, अशी विचारणा केली. त्यांनी परवानगी देताच सूळ आणि मिलिंद रेणूके यांनी आपला जुना लष्करी गणवेष बाहेर काढला. तो परिधान करून गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी गेले. चाचणी करून घेण्यात धोका नाही उलट फायदाच आहे, हे त्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
गावातील माजी सैनिक तेही वर्दीत येऊन सांगत आहेत, हे पाहून गावकऱ्यांचे मतपरिवर्तन झाले. एक एक करता शेकडो ग्रामस्थ शिबिरात आले. तब्बल ११५ जणांची चाचणी झाली. सुदैवाने सर्वजण निगेटीव निघाले. सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. माजी सैनिकांवर विश्वास ठेवून ग्रामस्थ चाचणी करून घ्यायला तयार झाले. आरोग्य पथक आणि गावाला मदत झाल्याने गावकऱ्यांनी त्यांचा सत्कारही केला. फसण्याच्या मार्गावर असलेले तपासणी शिबीर माजी सैनिकांमुळे यशस्वी झाले.

क्लिक करा आणि वाचा-
माजी सैनिक सूळ यांनी सैन्य दलात असताना आरोग्य विभागाशी संबंधित काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष चाचणीच्यावेळीही पथकाची मदत केली. देशसेवा करताना आलेला अनुभव गावाची सेवा करताना उपययोगी पडल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. उरलेल्या ग्रामस्थांची पुढील टप्प्यात चाचणी होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here