मुंबई : मुंबईत महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका नौदलाच्या पत्नीवर त्याच्या सहकाऱ्याने बलात्कार केल्याचं समोर येत आहे. गेल्या महिन्यात हा गुन्हा घडला होता परंतु पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक केली असता 17 मे रोजी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आणि पतीने गेल्या वर्षी मुंबईच्या कुलाबा भागात भाड्याने घर घेतलं होतं. घटनेच्या वेळी पीडितेचा नवरा प्रशिक्षणासाठी केरळला गेला होता. याचाच फायदा घेत आरोपी अविवाहित मित्राने घरी जाऊन पीडितेवर अत्याचार केले.

सुरुवातीला महिलेने या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. कारण, आरोपीकडून तिला जीवे मारण्याची आणि पतीला खोटं सांगेन अशी धमकी देण्यात आली होती. परंतू तरी पीडितेने मोठ्या धैर्याने तिच्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. ज्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कसा घडला प्रकार?
पीडितेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिलला आरोपीला बढती मिळाल्याने तो खूश होता आणि त्याने दुबईहून चॉकलेही आणले होते. तो भेटण्यासाठी घरी आला. यावेळी त्याने काही पेयेही घेतली होती. पण डोकं दुखत असल्याने महिला तिच्या खोलीमध्ये गेली. यानंतर काही वेळाने आरोपी हेड मसाज करून देण्याच्या बहान्याने खोलीत आला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी महिलेकडून त्याला रोखण्यात आलं पण त्याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. सध्या या प्रकरणाचा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here