सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लशीबाबतच्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. केंद्र सरकारने लशीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. इतकेच नाही तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइन्सवर देखील केंद्र सरकारने विचार केला नाही, असे सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.
लशीच्या उपलब्धतेचा विचार न करताच केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला नसल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यायची गरज असते. लसीकरण गरजेचेच आहे, मात्र लसीकरण केल्यानंतरही अनेक जणांना करोनाची लागण होत आहे. करोना होऊ नये यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन नागरिकांनी केले पाहिजे, असे जाधव म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात १८ ते ४४ वयातील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले असले तरी देखील लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने सरकारने या वयोगटासाठीची लसीकरण प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वयोगटातील नागरिक खासगी रुग्णालयात लसीकरण करून घेऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण कधी सुरू होणार?
मुंबई, ठाणे, रायगड येथील १५ बड्या खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये अपोलो हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, डीएचए रिलायन्स इंडस्ट्रीज, कोकिळाबेन हॉस्पिटल, क्रिटिकेअर, नानावटी हॉस्पिटल अशा हॉस्पिटलचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या ठरावीक भागांमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू असताना केवळ पुणेकरच त्यापासून वंचित का, असा प्रश्न निर्माण होत असून याबाबत सरकारी आरोग्य यंत्रणेकडे कोणतेही उत्तर नाही.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times