तौक्ते चक्रीवादळामुळं कोकणला आर्थिक फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकणचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरुन विरोधीपक्षानं सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
वाचाः
‘विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टिका करत आहेत हे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्यसरकारची भूमिका असेल,’ असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
वाचाः
‘देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रसरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र, आग्रह धरत नाही आणि राज्यसरकार काय देणार यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज दिले. आत्ता जनतेनं प्रश्न उपस्थित केल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत पण महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे,’ असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिलाय.
वाचाः
दरम्यान, ‘देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times