पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच देश स्मशानभूमी बनला असल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे. खरंतर, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले हे रायगड दौऱ्यावर आहेत. तिथे ते पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थट्टा करण्याचं काम भाजपने केलं. पण त्यांच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमि झाली असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. करोना रोखण्यासाठी केंद्राने काहीही उपाययोजना केल्या नाहीत असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नाना पटोले यांनी रायगडमधील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी मच्छिमारांच्याही भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या बोटी, नारळाच्या बागा, घरांचीही पाहणी केली. तर हा पाहणी अहवाल तातडीने शासनाला पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
el-criticize-on-pm-narendra-modi-crying/articleshow/82855517.cms
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times