येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरमध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष बालकक्षाचे ऑनलाइन उद्घाटन संजय राऊत यांनी केले. त्यावेळी संजय राऊत बोलत होते.
या सेंटरमध्ये ४० खाटांची व्यवस्था आहे. करोना उद्रेकाच्या या काळात प्रत्येक ठिकाणी सरकार पोहचेल याची खात्री देता येत नाही. राज्यात करोनाची दुसरी लाट आली असून या दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्थांसह सर्वसामान्य व्यक्ती झोकून देऊन काम करत आहेत, असे म्हणत शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालये उभारून रुग्णांना सेवा देणे ही मोठी राष्ट्रसेवा असल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी सकारात्मक राहून काम करा असे आवाहनही केले.
क्लिक करा आणि वाचा-
करोनाशी लढा देत असताना आता ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसने देखील सर्वांपुढे आव्हान उभे केले आहे. हा आजार वेगाने वाढत असून त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. ब्लॅक फंगसचा साथरोगांच्या कायद्यातही समावेश करण्यात आला आहे. याच ब्लॅक फंगसची उपमा खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना देत त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेनचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक ॲड. अविनाश साळवे उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times