मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अशात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये करोनाचा धोका जरी कमी झाला असला तरी राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अद्यापही वाढत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

खरंतर, जिल्ह्यांमधील करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा वाढता धोका कमी करण्यासाठी होम आयसोलेशन बंद करण्यात येणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

हे आहेत १५ जिल्हे…
कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद.

‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण आता राज्य शासनाने ठरविले आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे राज्यासाठी आवश्यक तीन हजार टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी, यासाठी ठिकठिकाणी प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here