गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख उतरणीला लागला आहे. ५० ते ६० हजारांपर्यंत पोहोचलेली रुग्णसंख्या आता ३० हजारांपर्यंत खाली आली आहे. मृतांच्या संख्येतही घट पाहायला मिळत आहे. कठोर निर्बंध, लसीकरणाचा वेग आणि आरोग्य यंत्रणेचे कठोर प्रयत्न यामुळं रुग्णसंख्येत सुधार आल्याचं चित्र आहे. तसंच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर वाढल्यानं आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आज राज्यात ४० हजार २९४ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ०९५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ०४ इतके झाले आहे. दिवसभरात २६ हजार १३३ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.
गेल्या २४ तासांत आज ६२८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या ८७ हजार ३०० इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १. ५८ टक्के इतका आहे. तर राज्यात सध्या ३ लाख ५२ हजार २४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२७,२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५(१६.९७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,५५,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times