नवी दिल्लीः करोना व्हायरसविरोधातील लस किती ( ) प्रभावी आहे? या तपास करण्यासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून () माहिती गोळा करण्यात येत आहे. आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे. करोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिका्ंना हॉस्पिटलमध्य्ये दाखल करावं लागलं? याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

लस घेतल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव खरच कमी होतोय का? यासाठी ही माहिती घेतली जात असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. राज्यांमध्ये आतापर्यंत किती जणांनी लस घेतली आहे? किती जण अॅक्टिव्ह आहेत? तसंच उपचारासंबंधी प्रोटोकॉल आणि करोना संसर्ग रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असण्याचा कालाविधीसंबंधी माहिती आयसीएमआरने मागितली आहे.

नागरिकांमधील गैरसमजही दूर होतील

कॉमन पोर्टल डेटा अपलोट करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातून करोनाविरोधी लस खरचं किती प्रभावी आहे? हे समजण्यात मदत होईल. तसंच आरोग्यासंबंधीच्या पायाभूत सुविधांवर किती ताण पडत आहे? याचीही माहिती मिळेल. लस घेतल्यानंतरही माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यास मदत होईल, असं आयसीएमआरचे वरिष्ठ महामारीत तज्ज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी सांगितलं.

१९ कोटी नागरिकांचे लसीकरण

देशात १६ जानेवारीपासून ते आतपार्यंत १९.४९ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी १५.१९ कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. करोनावरील लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही ४.३० कोटी आहे.

कोविशिल्ड लस ही करोनच्या बी1.617.2 व्हेरियंटवर प्रभावी असल्याचं ब्रिटीश सरकारने म्हटलं आहे. सीरम इन्स्टिट्युटची ही कोविशिल्ड लस आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here