मुंबई: तौक्ते चक्रीवादळानंतर यांनी कोकणाला दिलेल्या भेटीवरून विरोधी पक्ष असलेला भाजप मुख्यमंत्र्यांवर सतत टीकेची झोड उठवत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वचनाची आठवण काढत भाजपने मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली, शब्दात भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. (bjp says promises to konkan by are false)

भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली आहे. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?, असा सवाल उपस्थित करत ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा उद्धव ठाकरे सरकारने केली, असे उपाध्ये यांनी पुढे म्हटले आहे.

गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केले होते, अशा शब्दात उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केले आहेत. निसर्ग चक्रीवादळावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही, आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मुख्यमंत्री खोटी आश्वासने देत आहेत- भाजपचे टीकास्त्र

आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही आश्वासने खोटी असल्याचा थेट आरोप उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल, हे नक्की, असे टीप्पणीही त्यांनी शेवटी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here