: जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृतांचा आलेखही वाढत आहे. शवागरात मृतदेह घेण्यासाठी अनेक नातेवाईक नकार देत असताना मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे प्रकार समोर येत आहेत. करोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचं मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना अमरावतीत घडली आहे.

अंजनगाव बारी येथील शिवकुमार तातोबाजी हजारे यांनी गाडगे नगर पोलिसात संबंधित मृत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याची तक्रार शनिवारी (दि.२२) गाडगेनगर पोलिसात दिली आहे.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील करोना विभागात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. शिवकुमार यांच्या आईला ३ मे रोजी येथील जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २० मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यावेळी मात्र उपचारासाठी दाखल करतेवेळी त्यांच्या गळ्यात असलेले सात ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र नातेवाईकांना दिले नाही.

त्यामुळे मंगळसूत्र अज्ञाताने चोरल्याची तक्रार दिल्यानंतर मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सक्रीय असल्याच्या बातमीने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याआधीही राज्यातील इतर भागात अशा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे माणुसकी संपत चालली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here