वॉशिंग्टन: अमेरिकेचे सिनेटर टेड क्रूझ यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर यांच्याबाबत केलेल्या एका ट्विटमुळे वाद निर्माण झाला आहे. टेड यांनी पुतीन यांना केजीबीचा पाठिंबा असलेला कम्युनिस्ट असल्याचे संबोधले. तर, त्याचवेळी एका वृत्तवाहिनीच्या निवेदकाने पुतीन यांना क्रेमोलिन क्रूझ म्हटले आहे. त्यानंतर आता #KremlinCruz सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

टेड यांनी पुतीन यांना कम्युनिस्ट आणि क्रूर हुकूमशहा असल्याचे म्हणत आपण कम्युनिझमविरोधात असल्याचे सांगितले. टेड क्रूझ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावरही टीका केली. बायडन यांनी रशियाला जर्मनीतील वादग्रस्त नॉर्डस्ट्रीम-२ नैसर्गिक वायू पाइपलाइन बनवण्यासाठी मदत केली आहे. टेड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये रशिया आणि अमेरिकेन सैन्याची तुलना करण्यात आली आहे.

वाचा:

यामध्ये अमेरिकन सैन्यामध्ये महिलांना दाखल करणे ही चुकीची कल्पना असल्याचे म्हणत टीका केली. त्यानंतर टेड यांच्यावर जोरदार टीका झाली. ‘एनबीसी’ या वृत्तवाहिनीचा वृत्तनिवेदक ब्रायन विलियम्स यांनी त्यांना ‘क्रेमलिन क्रूझ’ असे म्हटले.
वाचा:

त्यावर क्रूझ यांनी म्हटले की, मी कम्युनिस्टांचा द्वेष करतो. त्यांनी माझ्या कुटुंबाला अटक केली आणि त्यांचा छळ केला. ब्रायन रशियन (चिनी आणि क्यबून) कम्युनिस्टांप्रमाणे वाद घालत आहेत.

वाचा:
तर, क्रेमलिनमध्ये कम्युनिस्टांचे सरकार आहे का, असा प्रश्न लेखक केविन क्रूझ यांनी टेड यांना केला. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, KGB चे कर्नल व्लादिमीर आहेत आणि राहणार. बहुतांशी कम्युनिस्ट हे क्रूर हुकूमशाह असतात असेही त्यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here