मुंबई: कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी यांनी बालरोग् तज्ज्ञांची टास्क फोर्सशी संवाद साधला. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याबाबत, तसेच ती आल्यास लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज व्यक्त होत आहेत. मात्र, आपण सावध राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray interacts with the to save children in the )

राज्या कोरोना विषाणूविरुद्ध लढाई लढत आहे. त्या लढाईत आपल्याला जरी पूर्ण यश मिळाले नसले, तरी देखील आपण राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. या लढाईतील हे यश डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे आहे आणि मी त्यात निमित्तमात्र आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी लढाईतील यशाचे श्रेय सर्वांना दिले. माझी टीम मजबूत व कुशल असल्याचेही ते म्हणाले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या साखळीप्रमाणे आपणही आपली एक घट्ट साखळी तयार करू आणि एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करु, असे सांगतानाच घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या ‘माझा डॉक्टर’ अर्थात फॅमिली डॉक्टरांना आपल्या मुलाला वेळीच दाखवा. असे केल्याने लगेचच उपचार सुरू होतील असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
माझे कुटुंब, माझी जबादारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे.

राज्यात आलेल्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला. तर दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. संसर्गाचं वय खाली येत असल्याने आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
लहान मुलांवर उपचार करत असताना काय करावे आणि काय करू नये हे डॉक्टरांकडून समजून घेतले पाहिजे. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. ते सांगतील ते उपचार आपण घेतो. मात्र हे करत असताना रोगापेक्षा उपचार भयानक होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागरिकांना दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here