सातारा: संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात आणखी कठोर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २४ मे मध्यरात्रीपासून ते १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत हे कठोर निर्बंध लागू असणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत. ( )

वाचा:

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार लॉकडाऊन कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा याकाळात बंद राहणार आहेत.

वाचा:

– रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, २४ तास औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय, आरोग्य सेवा व सदर सेवा पुरवणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे अशा सेवांना लागणारा कच्चा माल, त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण, व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स, सकाळी ७ ते ९ पर्यंत सुरू राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दूध वितरणास परवानगी असेल.

– शेती विषयक सेवा व शेती सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरवणाऱ्या सेवांची दुकाने उघडता येणार नाहीत. तथापि, सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत घरपोच सेवा देण्यास मुभा असेल. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे ऑनलाइन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागेल.

वाचा:

– शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरू राहील. शीतगृहे व गोदाम सेवा, स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम, स्थानिक प्राधिकरणांच्या सार्वजनिक सेवा, भारतीय सुरक्षा, विनियमन मंडळाची कार्यालये व मान्यताप्राप्त बाजार मूलभूत संस्थांकडे नोंदणीकृत असलेले एजंट, टेलिकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा, वस्तू व माल वाहतूक, पाणी पुरवठा सेवा, ई – व्यापार फक्त (अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवण्यासाठी), प्रसार माध्यमे, पेट्रोल/डिझेल पंप फक्त वर नमूद केलेल्या व सूट दिलेल्या वाहनांसाठी व अत्यावश्यक सेवेतील खासगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, मीडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरू राहतील.

– अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा यासाठी पेट्रोल व डिझेल पंप २४ तास सुरू राहतील. सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलिफोन सेवा, एटीएम, टपाल सेवा, लस, औषधे, जीवनरक्षक औषधे, संबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाऊस, एजंट परवानाधारक, मल्टीमोडल ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर्स, कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियलची उत्पादन केंद्रे सुरू राहतील.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here