वाचा:
‘’चे काम करणारे (वय ३५) हे दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बँकेमध्ये रक्कम भरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी चौधरी यांच्या बॅगमध्ये १९.५० लाख रुपये होते. काही अंतरावरच लुटारूंनी त्यांच्या डोळयात मिरचीपूड फेकून ही रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे चौधरी यांनी लुटारुंचा हल्ला परतवून लावला होता. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याबाबत कसून तपास केला. शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या आधारे (२७, रा. अकोली), साहील नरेश मेश्राम (२४, रा. माता फैल बडनेरा) आणि यश सुनील कडू (२४, रा. जेवडनगर) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
वाचा:
अशा आवळल्या आरोपींच्या मुसक्या…
घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी लुटारूंच्या शोधात फ्रेजरपुरा, कोतवाली, गाडगेनगर, राजा पेठ आणि बडनेरा या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ४० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून पोलिसांना मागल लागला. कोतवाली पोलीस शनिवारी सकाळी साईनगर भागातील एका कुरिअरच्या कार्यालयाजवळ पोहचले. याच कुरिअरच्या कार्यालयात अनिकेत जाधव काम करतो व त्यानेच चौधरींबाबत ‘टिप’ त्याच्या मित्रांना दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा मास्टर माइंड अनिकेत जाधव असल्याचेही समोर आल्यामुळे कोतवाली पोलिसांनी शनिवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यानंतर साहील मेश्राम व यश कडू यांना पळून जाण्याच्या तयारीत असताना बडनेरा रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. या तिघांना पकडल्यानंतर प्रत्यक्ष गुन्हा करतेवेळी यश व साहील यांच्यासोबत आणखी एक जण असल्याचे समोर आले आहे, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times