मुंबई: एमएमआरडीए मार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या विविध कामांची रविवारी पालकमंत्री यांनी पाहणी केली. यात मालाड (पश्चिम) येथे एमएमआरडीए मार्फत उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोव्हिड-१९ हॉस्पिटलच्या कामाची पाहणी करण्यात आली. ( )

वाचा:

रुग्णांसाठी मुंबईत पुरेशा उपचार सुविधांची उपलब्धता करणे तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने हे सुसज्ज समर्पित उभारण्यात येत आहे, असे पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री , एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यावेळी उपस्थित होते.

वाचा:

यानंतर पालकमंत्री ठाकरे यांनी मालाड (पूर्व) येथील भूस्खलन झालेल्या जागेला भेट दिली. मागील वर्षी भूस्खलन झालेल्या या जागेवर यंदा एमएमआरडीएमार्फत आयआयटीच्या सहयोगातून भूस्खलन रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यानंतर पालकमंत्री ठाकरे यांनी एमएमआरडीएमार्फत काम सुरू असलेल्या कलानगर उड्डाणपूलाच्या मार्गिकेची पाहणी केली. या मार्गिकेचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, जेणेकरून कलानगर जंक्शन येथील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेणार आहे. शहरात एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेली ही विविध कामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत. तसेच पावसाळ्यात लोकांची सोय होण्याच्या दृष्टीने कामे जलदगतीने करण्यात यावीत, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. एमएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, सहआयुक्त बी. जी. पवार आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

वाचा:

बीकेसी कोविड सेंटरप्रमाणेच सुविधा

मालाड येथे एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड सेंटरची पाहणी केली. या कोविड सेंटरमध्ये बीकेसी येथील कोविड सेंटरप्रमाणेच सर्व सुविधा असतील. संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून पिडिअ‍ॅट्रिक वॉर्डही येथे असेल. एकूणच वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ट्वीट या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here