टोकियो: जपानमधील रेल्वेचा वक्तशीरपणा आणि त्यांची कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता याचे जगभरात कौतुक होते. मात्र, एक वेगळीच घटना समोर आली आहे. जगातील वेगवान ट्रेन असलेल्या बुलेट ट्रेनचा चालक चक्क तीन मिनिटांसाठी केबिनमधून बाहेर गेला होता. त्यावेळी बुलेट ट्रेनमध्ये १६० प्रवासी होते आणि रेल्वेचा वेग तब्बल १५० किमी प्रतितास इतका होता. पोटात दुखत असल्यामुळे नैसर्गिक विधीसाठी या चालकाने केबिन सोडली होती असे म्हटले जात आहे.

बुलेट ट्रेनच्या चालक १५० किमी प्रतितास या वेगाने ट्रेन चालवत होता. त्यानंतर चालकाने धावत्या ट्रेनचा ताबा सोडून प्रसाधनगृहात गेला. या दरम्यान जवळपास तीन मिनिटे बुलेट ट्रेनचे कॉकपीट चालकाशिवाय होते. जपानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा चालक ३६ वर्षीय असून ६३३ क्रमांकाची चालवत होता.

चालकामुळे खळबळ

प्रसाधनगृहात जात असताना चालकाने ट्रेनच्या वाहकावर बुलेट ट्रेन नियंत्रित करण्याची जबाबदारी सोपवली. या वाहकाकडे ट्रेन चालवण्याचा कोणताही परवाना नव्हता. ही घटना स्थानिक वेळ सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या वेळेदरम्यान मोठ्या संख्येने प्रवाशी प्रवास करत असतात. ट्रेन चालकाने केबिन सोडली तेव्हा ट्रेन शिजुओका प्रांतातील अटामी आणि मिशिमा स्टेशन दरम्यान होती.

वाचा:

चालकाने मागितली माफी

जपानमध्ये वाहकाकडे ट्रेनमध्ये प्रवासी चढवण्याची-उतरवण्यासह इतर कामांची जबाबदारी असते. ट्रेन चालवण्याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण त्यांना दिले जात नाही. अशावेळी काही चालक आणि वाहकाने शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात घातले. या प्रकाराबद्दल चालकाने माफी मागितली. बऱ्याच वेळेपासून आपण नैसर्गिक विधी रोखून धरला होता. त्यामुळे पोटात दुखू लागले. जवळच्या स्थानकावर ट्रेन थांबवली असती तर उशीर झाला असता.

वाचा:
कंपनीकडून स्पष्टीकरण

ही घटना १६ मे रोजीची असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर ट्रेन चालवणारी कंपनी जे. आर. सेंट्रलने माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेची माहिती जपानच्या भूमी, पायाभूत सुविधा, परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाला दिली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी आणि शिस्त कायम ठेवण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले.

वाचा:
दररोज लाखो प्रवाशांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी रेल्वेची भूमिका महत्त्वाची ठरते. जपानमधील लोकांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुकही होते. मात्र, वक्तशीरपणाची किंमत रेल्वेच्या चालकांना मोजावी लागत असल्याचे या घटनेतून समोर आले असल्याचे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here