वाचा:
कॅम्प ५ च्या जय जनता कॉलनी परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. याच कॉलनीत कुटुंबासोबत राहणारा अनिल हा चहाच्या टपरीवर कामाला होता. काल मध्यरात्रीच्या सुमारास तो रस्त्याने चालला होता. त्याचवेळी आरोपी साहिल मैराळे हा कॉलनीतील एका गल्लीत अमली पदार्थांची नशा करत बसला होता. त्यानं अनिलकडं २० रुपयांची मागणी केली. मात्र, अनिलनं पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या साहिलनं अनिलवर चाकूचे अनेक वार केले. चाकू हल्ल्यानंतर साहिल तिथून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अनिलला स्थानिकांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.
वाचा:
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या दोन तासांतच कॅम्प चारच्या सर्टिफाइड मैदानाजवळून साहिलला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी साहिल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times