मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, पंतप्रधानांनी भेट नाकारली होती, असं म्हणत संभाजीराजेंनी पंतप्रधानांच्या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केली होती. यावरुन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
‘संभाजीराजेंनी विविध विषयांवर जेव्हा पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली असेल, तेव्हा ती त्यावेळी नक्कीच मिळाली असेल. मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे. मराठा आरक्षणात केंद्राची भूमिका कुठे होती. १०२व्या घटना दुरुस्तीनंतर देखील राज्याचा अधिकार आहे, हे एकदा न्यायालयाला समजून सागण्याची भूमिका केंद्रानं मान्य केली आहे. त्यामुळं संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या विषयात पंतप्रधानांना भेटून काय होणार? त्यामुळं कदाचित त्यांनी भेटीला नाही म्हटलं असेल,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संभाजीराजे, विनायक मेट, राजेंद्र पोडरे, विनोद पाटील असू देत कुठल्याही नावाने जर आंदोलन करणार असतील, मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही त्यात बॅनर, झेंडा, बॅच शिवाय एक नागरिक म्हणून सहभागी होवू, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times