मुंबई: शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये अधूनमधून कोणत्या ना कोणत्या कारणावरून कुरबुरी सुरू असतात. विशेषत: काँग्रेसच्या गोटातून तक्रारीचा सूर वरचेवर येत असतो. त्यातून उत्तरे-प्रत्युत्तरे होत असतात. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष () यांच्या एका वक्तव्यावरून अशीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आमच्यामुळं आहे. आम्ही सरकारमुळं नाही. आमचाही सरकारमध्ये मोठा वाटा आहे,’ असं वक्तव्य नुकतंच नाना पटोले यांनी केलं आहे. त्याला शिवसेनेचे खासदार () यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे हे म्हणणं बरोबरच आहे. काँग्रेसशिवाय सरकार आहे असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. इतरही कोणी ते नाकारलेलं नाही. काँग्रेस हा सरकारचा एक स्तंभ आहे. नाना पटोलेंना ही शंका का यावी?,’ असा उलट सवाल राऊत यांनी केला आहे.

वाचा:

‘राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. बाकी सगळे नंतर आले.
सोनियाजी, राहुलजी, प्रियांका यांच्यासोबत आमच्या अनेकदा चर्चा झाल्या. शरद पवार, उद्धवजी ठाकरे हे देखील होते. या सर्वांनी संमती दिल्यानंतरच हे सरकार बनलं आहे. त्यामुळं एकमेकांच्या सहकार्यानंच हे सरकार चाललंय. याचं विस्मरण तिन्ही पक्षांपैकी कोणालाही झालेलं नाही,’ अशी संयमी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

वाचा:

नाना पटोले हे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत. प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून ते काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडत असतात. महाविकास आघाडीतील काँग्रेसचं महत्त्व ते सातत्यानं अधोरेखित कररत असतात. त्यातून संजय राऊत व नाना पटोले यांच्यात याआधीही अनेकदा शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here