पुणे: राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी दौऱ्यानंतर आता शिवसंग्राम संघटनेचे नेते यांनी आता काढण्याचा इशारा दिला आहे. रद्द झाल्यावरही राज्य सरकारने गाढवपणा केला असून सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात आता मूक नाही, तर बोलका मोर्चा काढणार अशी भूमिका मेटे यांनी घेतली आहे.

विनायक मेटे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका घेणारे खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नांबाबत देखील भाष्य केले. संभाजीराजे चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांनी अजूनही भूमिका घेतली नसल्याचे ते म्हणाले. आपली भूमिका ते २७ मे या दिवशी जाहीर करतील असे दिसत आहे. असे असले तरी देखील ते काम मात्र चांगले करत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतरच त्यावर अधिक बोलता येईल, असे मेटे म्हणाले.

मेटे यांनी यावेळी सारथी संस्थेबाबतही आपले विचार व्यक्त केले. बार्टीच्या धर्तीवर सारथी संस्थेला देखील मदत मिळायला हवी असे मेटे म्हणाले. सारथीमध्ये केवळ ५ ते ६ इतके कर्मचारी आहेत. मात्र आता लवकरच येथे सुमारे १३९ कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. सारथी संस्थेत अनेक अडचणी निर्माण झाल्या असून पीएचडी करणाऱ्या २३९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. असे असतानाही त्यांना फेलोशीप मात्र मिळू शकलेली नसल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
केंद्र सरकारने एमफील देखील बंद केले असले तरी देखील ज्यांनी या आधीच एमफील पूर्ण केले आहे, अशा विद्यार्थ्यांना पीएचडीची परवानगी दिली गेली पाहिजे, असे मेटे म्हणाले. येत्या १ जून रोजी विद्यार्थ्यांना फेलोशीप मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here