करोनावर () अद्याप कोणत्याही शास्त्रात नेमके औषध सापडलेले नाही. विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी आम्ही कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ केला. त्यामध्ये कोणतही अंधश्रद्धा नाही. तरीही अंनिसने तक्रार केली. मात्र, पारनेर तालुक्यातच काही कोविड सेंटरमध्येही वेगळे कार्यक्रम होत आहेत. नृत्यांगणाही नाचविल्या जात आहेत, ते कसे चालते, असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केला आहे. (mahayagya is objected in then why dancers are allowed asks sujit zaware)
पारनेर तालुक्यात माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात तेथे विश्वशांती महायज्ञ करण्यात आला. याबद्दल अंधश्रदधा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. हा अंधश्रदधा परसविण्याचा प्रकार असून करोना रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे. यामुळे संयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसतर्फे करण्यात आली आहे.
यावर आपली बाजू मांडण्यासाठी झावरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कोणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये. प्रार्थना करणे हा गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. करोनावर आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध सापडलेले नाही. सध्या जे उपचार सुरू आहेत, ते सर्व अंदाजेच सुरू आहेत. त्यामुळे विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन रुग्णांना समाधान मिळणार असेल तर असा यज्ञ करण्यात काहीही गैर वाटत नाही. याच भावनेतून परमेश्वरावर श्रद्धा ठेऊन हा यज्ञ करण्यात आला होता.
क्लिक करा आणि वाचा-
गाईच्या दुधापासून बनविलेले तूप व गोवरी जाळल्यामुळे त्यातून ऑक्सिजनच बाहेर पडतो, हे विज्ञान सांगते. त्यामुळे त्याचा धोका नाही. उलट करोना रुग्णांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला. आपल्यामागे परमेश्वर आहे, अशी भावना या रुग्णांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली. असे असूनही अंनिसने जिल्हाधिकार्यांकडे महायज्ञबाबत तक्रार केलेली आहे. मात्र, इतर सेंटरमध्ये प्रवचने, वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्याबद्दल कोणीच का बोलत नाही?, असा सवाल झावरे यांनी विचारला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
आम्ही यज्ञ केल्यावर कारवाईची मागणी होते. तर मग अशा इतर कोविड सेंटरबाबत गप्प का आहे? यामागे काहीतरी राजकीय षड्यंत्र असल्याचा संशय येतो. पारनेर तालुक्यात अनेक कोविड सेंटर आहेत. काही सेंटरमध्ये नृत्यांगणा नाचविल्या जातात. रुग्णांना नाचविले जाते. रुग्ण बरा होण्यासाठी औषध चाटण्यासाठी दिले जाते, ही अंधश्रद्धा नाही का? त्यावेळी अंनिसचे कार्यकर्ते कोठे गेले होते? असा सवालही झावरे पाटील यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times