मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ता यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. हा विषय राज्याचा आहे असे पंतप्रधान मोदी यांना वाट असल्याने आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकली नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. या वक्तव्याचा समाचार घेत सावंत यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. (congress spokesperson criticizes bjp leader )

काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विट करत हा निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख मनकवडे असा केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांपैकी पहिली म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विषयांची समज फार कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही आणि तिसरी म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे.

खासदार संभाजीराजे यांना पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ का दिली नाही, असा प्रश्न पत्रकारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याचे पंतप्रधान मोदी यांना वाटत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे पाटील यांनी म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-
मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे राज्य सरकार केवळ चर्चाच करत आहे. पुनर्विचार याचिकेद्वारे केंद्र सरकार प्रभावीपणे भूमिका मांडणार आहे. मात्र, असे असले तरी ५० टक्क्यांचा मुद्दा आणि जास मागास ठरवणे याचे अधिकार राज्याकडे सोपण्यात आले आहेत, असे सांगतानाच त्यामुळेच संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या विषयात पंतप्रधान मोदींना भेटूनही काय होणार?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here