: जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदी घोषित करण्यात आली. ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच अवैध धंदे सुद्धा वाढले आहेत. दर्यापूर शहरातील कासदपुरा येथे अवैधरीत्या गोमांसाची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे.

आरोपींकडून १६५ किलो गोवंशाचे मांस, वजनकाटा व कटाईचे इतर साहित्य असा एकूण ३४ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून शेख युनूस आणि रहीम खान या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

शहरातील कासदपुरा येथील शेख युनूस शेख घुडन यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली असता अवैधरीत्या गोवंशाची कत्तल करून मांस विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून १६५ किलो गोवंशाचे मांस, वजनकाटा व कटाईचे इतर साहित्य असा एकूण ३४ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई ठाणेदार प्रमेश आत्राम, पीएसआय रवीकिरण खंदारे, नापोकाँ प्रशांत ढोके, बजरंग इंगळे, नितीन पाटील, सिद्धार्थ आठवले, दिलीप घोडे, रमेश भुजाडे, रवी तायडे, पोकाँ सागर नाठे, शरद सारसे, विशाल कलाने, महिला पोलिस वंदना वेलकर, अर्चना सपकाळ, सविता पवार यांच्या पथकाने केली.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले मांस नष्ट करण्यात आले असून, त्याचे काही नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here