म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने रेखाचित्राच्या बाबतीत पोलिसांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सुरू केलेल्या कोर्सच्या ८३ जणांच्या पहिल्या बॅचने प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे राज्यात आता पोलिसांना काढण्यासाठी खासगी व्यक्तींवर अवलंबून राहवे लागणार नाही. (The first batch of were trained to make )

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करळमकर यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राज्यात अनेक महत्वाच्या गुन्ह्यात रेखाचित्रांनी आरोपींना पकडण्यात महत्वाची भूमीका पार पाडली आहे. पण, पोलिसांना रेखाचित्रासाठी नेहमची खासगी व्यक्तींवर अवलंबून राहवे लागत होते. त्यामुळे राज्याचे तत्कालिन महासंचालक सुबोध जयस्वाल व सीआयडीचे प्रमुख अतुचंद्र कुलकर्णी यांनी पोलिस दलातच टॅलेन्ट विकसीत करण्यासाठी रेखाचित्र प्रशिक्षण कोर्स सुरू केला होता.

या प्रशिक्षण कोर्सला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य भरातून ८३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पहिल्या बॅचसाठी नोंदणी केली. या कोर्ससाठी सीआयडीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करार करण्यात आला.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील पुणे ग्रामीणचे दोन, पुणे शहर पाच, गुन्हे अन्वेषण विभाग पाच, गुप्त वार्ता विभाग १०, पोलिस संशोधन केंद्रातून एक असे अधिकारी व राज्यातील कर्मचाऱ्यांनी ५५ दिवसांचा कोर्स पूर्ण केला. या प्रशिक्षणार्थींना प्रा. गिरीश चरवढ यांनी नेमणूक केली होती. या प्रशिक्षणार्थी काढलेल्या रेखाचित्रा परिक्षण तज्ज्ञ व्यक्तींकडून करण्यात आले. त्यांनी काढलेली रेखाचित्र उत्कृष्ट असल्याचे सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
संशयित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेजमधील अस्पष्ट दिसणाऱ्या व्यक्ताचे रेखाचित्र काढण्यास प्रशिक्षण दिल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. यापुढील बॅच लवकरच सुरू केली जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थितांचे पोलिस उपमहानिरीक्षक संभाजी कदम यांनी आभार मानले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here